Friday, 18 January 2019

वाजपेयींची अंत्यविधी सोडून नवज्योतसिंह सिद्धू पाकिस्तानात...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू हे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्यविधीला उपस्थित न राहता पाकिस्तानला गेल्याने सर्वत्र चर्चांना उधाण आले आहे. या चर्चैचं कारण आता समोर आले आहे. 

पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळण्यासाठी ते पाकिस्तानात हजर झाले आहेत. स्वत:ला वाजपेयी साहेबांचा सैनिक म्हणणारे नवज्योतसिंग सिद्धू त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी न होता पाकिस्तानला का गेले असा प्रश्न उपस्थित होत आहे.

इम्रान खान आज पाकिस्तानचे 22 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. माजी क्रिकेटपटूंनी देशभरातून नव्याने निवडून आलेल्या संसदेचे आज (गुरुवारी) नवीन पंतप्रधान म्हणून निवडले आहे.

अध्यक्ष ममनून हुसैन यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. दरम्यान, माजी क्रिकेटपटू आणि पंजाबचे स्थानिक स्वराज्य मंत्री नवज्योतसिंह सिद्धू पाकिस्तानात इम्रानच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होते. त्यांनी इम्रानला भेट म्हणून पश्मीनाची शाल भेट घेऊन आले आहेत. सिद्धू यांना 15 दिवसांचे व्हिसा मिळालेले आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य