Sunday, 20 January 2019

केरळमध्ये पूरपरिस्थिती, मदतीचं आवाहन

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

केरळमध्ये मुसळधार पावसानं थैमान घातले आहे. या पावसामुळे केरळमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामध्ये आतापर्यंत  324 जणांचा बळी घेतला आहे, तर दोन लाख नागरिक बेघर झाले आहेत. तसंच जोरदार पावसानं आलेल्या केरळ पुरात आतापर्यंत 8 हजार कोटींचं नुकसान झालं आहे.

हवामान खात्यानं राज्यातील 14 पैकी 13 जिल्ह्यांत पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच सेंट्रल वॉटर कमिशनही पुराचं पाणी तुंबणा-या भागावर नजर ठेवून आहे. 

केरळमध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहता एनडीआरएफच्या पाच टीम तिरुअनंतपुरममध्ये दाखल झाल्या आहेत. सध्या एनडीआरएफच्या टीमकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. तसेच एनडीआरएफची आणखी जवान केरळमध्ये दाखल होणार आहेत. 

केरळच्या मुख्यमंत्र्यांचं मदतीचं आवाहन -

केरळमधल्या पथनमतित्ता जिल्ह्यातील रन्नी, अरनमुला, कोझेनचेरी गावांतील लोक मुसळधार पावसामुळे घरातच अडकून पडली आहेत. पथनमतित्ता, एर्नाकुलम आणि थरिस्सूर जिल्ह्यांतील अनेक भागात पाण्याची पातळी 20 फुटांहून अधिक आहे. त्यामुळे गल्लीबोळाला नद्यांचं स्वरूप आलं आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अन्य केंद्रीय मंत्र्यांकडे जास्तीची मदत मागितली आहे. 

 

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य