Tuesday, 20 November 2018

अटलबिहारी वाजपेयींसाठी देशभरात प्रार्थना, देशातील सर्व नेते एम्समध्ये दाखल...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावली असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

गेल्या 24 तासात वाजपेयींची प्रकृती गंभीर झाल्याचे एम्सच्या निवेदनात सांगण्यात आले आहे.

दरम्यान केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या सर्वच ज्येष्ठ नेत्यांनी एम्समध्ये जाऊन वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी रात्रीचं एम्समध्ये जाऊन वाजपेयींची भेट घेतली.

त्यानंतर आज सकळपासून अमित शहा, लालकृष्ण अडवाणी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनीही एम्समध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे.

अटलबिहारी वाजपेयींचं आणखी एक मेडिकल बुलेटिन संध्याकाळी 5.30 वाजता  होणार आहे.

 

वाजपेयींवर एम्समध्ये दवा, देशभर दुवा...

  • अटलबिहारी वाजपेयी एम्समध्ये मागील 9 आठवड्यापासून दाखल
  • दुर्दैवाने गेल्या 24 तासांत त्यांची प्रकृती चिंताजनक
  • त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे - एम्स
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी वाजपेयी यांच्या आरोग्याची चौकशी करण्यासाठी एम्सला उपस्थित
  • मोदी यांनी आज वाजपेयी यांच्या आरोग्याची चौकशी करण्यासाठी 40 मिनिटांहून अधिक वेळ एम्समध्ये घालवला
  • राजधान सिंहपासून सुषमा स्वराजपर्यंत सर्व महत्वाचे केंद्रीय मत्री एम्समध्ये तळ ठोकून
  • राहूल गांधी, अरविंद केजरीवाल, फारुख अब्दुला यांनीही वाजपेयी यांची एम्सला भेट घेतली
  • तसेच देशातील सर्वपक्षीय नेतेही त्यांना भेटण्यासाठी एम्समध्ये दाखल
  • वाजपेयींची प्रकृती गंभीर असल्याने सर्व पक्षीय कार्यक्रमासह केंद्र सरकारचेही अनेक कार्यक्रम रद्द
  • वाजपेयी यांच्या आग्रा, ग्लालियर इथले सर्व नातेवाईक दिल्लीला रवाना
  • देशभरात सर्वधर्म प्रार्थनांच आयोजन 

देशभरातून अटलजींच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना, ठिकठिकाणी होमहवन तर नमाज केला जातोय अदा...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार दिल्लीला रवाना, तर सरसंघचालक मोहन भागवत दिल्लीत दाखल

अटलबिहारी वाजपेयींची प्रकृती चिंताजनक...

निरोप एका युगाला...

वाजपेयींना अखेरचा निरोप - Pics

वाजपेयींच्या अंत्यदर्शनाला आलेल्या स्वामी अग्निवेश यांना मारहाण...

वाजपेयींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मानसकन्या नमिता यांनी दिला मुखाग्नी

वाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध, नगरसेवकाला मारहाण

राज ठाकरेंची व्यंगचित्राद्वारे अटलजींना श्रद्धांजली...

जाणून घ्या वाजपेयींच्या संपत्तीबद्दल...

वाजपेयी यांच्या अंत्यविधीला पाकिस्तानचेही प्रतिनिधी उपस्थित...

वाजपेयींचे मराठी प्रेम

वाजपेयींचे पार्थिव भाजप मुख्यालयात दाखल...

अशुभ '13' अंकाशी वाजपेयींचं खास नातं

वाजपेयींच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार...

वाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीतील 5 निर्णायक घटना!

भारतरत्न अटलजींसाठी सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर...

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची कारकीर्द...

अटलबिहारी वाजपेयींसाठी देशभरात प्रार्थना, देशातील सर्व नेते एम्समध्ये दाखल...

 

Atal Bihari Vajpayee - timeline

1924 •

ग्वाल्हेर येथे जन्म

25 डिसेंबर 1924 रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरात अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कृष्ण बिहारी तर आईचे नाव कृष्णा देवी होते.
• 1955

पहिली लोकसभा निवडणूक

वाजपेयी 1951 पासून राजकारणात सक्रिय झाले. 1955 साली ते पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढले. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला.
1957 •

पहिल्यांदा खासदार

वाजपेयी एकूण 10 वेळा लोकसभा खासदारपद भूषवलं. तसंच 1962 आणि 1986 साली राज्यसभा खासदारही ते होते.
• 1996

पहिल्यांदा पंतप्रधान बनले

अनेक वर्षं विरोधक म्हणून गाजवल्यावर वाजपेयी 1996 साली पहिल्यांदा पंतप्रधान बनले. मात्र त्यांचं सरकार संख्यबळाआभावी 13 दिवसच टिकलं.
1998 •

पुन्हा एकदा पंतप्रधान

1998 साली लोकसभा निवडणुकांत भाजप पुन्हा प्रबळ दावेदार झाला. वाजपेयी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. मात्र 13 महिन्यांत सरकार पुन्हा एकदा कोसळलं. विश्वासमत प्रस्तावाच्या वेळी वाजपेयी सरकार अवघ्या एका मताने पडलं.
• 1998

कणखर पंतप्रधान

विरोधी पक्षही सरकार स्थापन करण्यात अयशस्वी ठरले. भारत पुन्हा लोकसभा निवडणुकांना सामोरा गेला. यानंतर पंतप्रधान बनलेल्या अटल बिहारी वाजपेयी वाजपेयी यांनी स्वतःच्या राजकारणाची आणि कणखरतेची छाप सोडली.
1998 •

पोखरण अणुचाचणी

सत्ताप्राप्ती नंतर अवघ्या एका महिन्यात वाजपेयी सरकारने पोखरण येथे 5 अणुचाचण्या घेऊन भारताचा दबदबा जगभरात निर्माण केला. या अणुचाचण्या जगाला विशेषतः अमेरिकेला हादरवणा-या ठरल्या. पोखरण येथील अणुपरीक्षण वाजपेयी यांनी घेतलेल्या सर्वांत महत्त्वपूर्ण निर्णयांपैकी एक मानलं जातं.
• 1998

कणखर आर्थिक धोरणं

भारताच्या अण्वस्त्र चाचण्यांमुळे अमेरिका, कॅनडा, जपान, इंग्लंड तसंच युरोपीय महासंघ यांनी भारतावर अनेक क्षेत्रात निर्बंध लादले. तरी वाजपेयींच्या आर्थिक धोरणांमुळे याची झळ लागली नाही.
1999 •

कारगील युद्ध

लाहोर भेटीत दोन देशादरम्यानचे संबंध सुधारण्यासाठी वाजपेयी प्रयत्‍न करत असतांना पाकिस्तान काश्मीरमध्ये घुसखोरी करत होता. वाजपेयी यांनी आपल्या कणखर नेतृत्त्वाची कमाल दाखवत ‘ऑपरेशन विजय’चा नारा दिला. 26 जुलै 1999 रोजी भारताने पाकिस्तानचा पराभव करत कारगीलवर तिरंगा फडकावला. चीन, अमेरिकेसारख्या देशांपुढे न झुकता वाजपेयी यांनी आपली मुत्सद्देगिरी आणि कणखरपणा दाखवून दिला.
• 1999 - 2004

ऑक्टोबर १९९९ - मे २००४ : तिस-यांदा पंतप्रधान

1999 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये रालोआला घवघवीत यश मिळाले आणि वाजपेयींनी सलग तिसर्‍यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली.
2015 •

भारतरत्न पुरस्काराने सन्मानित

2005 सालापासून राजकीय संन्यास घेतलेल्या वाजपेयींना 2015 साली देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान असणा-या ‘भारतरत्न’ने सन्मानित करण्यात आलं.
• 2018

अखेरचा श्वास

16 ऑगस्ट 2018 रोजी वाजपेयी यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात वाजपयी यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र अखेर संध्याकाळी 5.05 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

loading...

Top 10 News

राशी भविष्य