Friday, 16 November 2018

#IndiaIndependenceDay चीनमध्ये फडकला भारताचा झेंडा...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

देशाचा आज 72 वा स्वातंत्र्य दिवस आहे, यानिमित्ताने देशभरात हा दिवस मोठ्या उत्सहात साजरा केला जात आहे. तसेच आपल्या देशावरील प्रेम आणि आपल्या देशाचा अभिमान स्वातंत्र दिनानिमित्त चीनमध्येही साजरा करण्यात आले आहे.

Chin12.png

 

चीन येथे कामासाठी आलेल्या आणि येथील मातीशी नाते जोडलेल्या भारतीयांनी चीन येथील यिवू शहरात जुनवई हॉटेलच्या बाहेर एकत्र येऊन स्वातंत्र्याचा वर्धापनदिन साजरा केला आहे. यावेळी नागरिकांनी ध्वजारोहण करत राष्ट्रगान सादर केले.

indiaflag-inchin.png

मुंबईतील आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या पुढाकाराने आयोजित कार्यक्रमात पंडित धर्मसागर ओझा, व्यापारी अब्दुला खान, हॉटेलचे मालक राजीव गुलाटी, सुभाष गायकवाड़, फरीद खान,आसिफ शेख आदी उपस्थित होते.

यावेळी चीनचा ध्वज सुद्धा फडकविण्यात आला. या कार्यक्रमात चीनी नागरिकदेखील सहभागी झाले होते. तसेच कार्यक्रमानंतर लाडूचे वितरणही करण्यात आले.

loading...

Top 10 News

राशी भविष्य