Wednesday, 21 November 2018

केरळमध्ये पावसाचा हाहाकार, 37 जणांचा मृत्यू

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृच्चसंस्था, नवी दिल्ली

गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे केरळमध्ये हाहाकार माजला आहे. जवळपास 54 लोक बेघर झाले आहेत. तर, 37 जणांचा मृत्यू झाला आहे. 

या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे, अनेकांना यात आपला जीवही गमवावा लागला आहे. अतिवृष्टीनंतरच्या पुरामुळे अनेक ठिकाणी महामार्गही वाहून गेले आहेत. 

दरम्यान ही सर्व परिस्थिती पाहता इडुक्की आणि त्या आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा हा कहर पाहता विविध ठिकाणी अनेकांनीच अन्नछत्र सुविधा चालवण्यास सुरुवात केली आहे. 

आतापर्यंत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 53 हजार 501 लोकांची मदत छावण्यांमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे. 

वायनाडमधील पनामरम येथेही बचाव कार्यासाठी अनेक हात पुढे सरसावल्याचं पाहायला मिळत आहे. वायनाडमधीलच मनतावडी गावातून एनडीआरएफच्या जवानांनी आतापर्यंत 6 जणांचा जीव वाचवला असून, त्यात 3 लहान मुलांचाही समावेश आहे. 

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य