Thursday, 17 January 2019

महाराष्ट्राच्या सुपूत्राला अखेरचा निरोप...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, दिल्ली

जम्मू आणि काश्मीरमधल्या बांदीपोरामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न रोखताना लष्कराचे चार जवान काल शहीद झालेत. या चार जवानांमध्ये महाराष्ट्राच्या सुपुत्राचाही समावेश आहे.

मीरारोड मध्ये राहणारे मेजर कौस्तुभ राणे हेदेखील देशासाठी शहीद झालेत. त्यांच्या पार्थिवावर आज मीरा रोडमध्ये लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मीरारोडच्या शीतलनगरमध्ये हिरल इमारतीमध्ये ते आपल्या कुटुंबाबरोबर राहत होते. सहा वर्षांपूर्वी ते सैन्यात भरती झाले होते. या महाराष्ट्राच्या सुपुत्राच्या शहीदाची बातमी ऐकताच राणे कुटुंबीयांवर शोककळा पसरलीय.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून मोठा घातपात घडवण्याचा कट रचला होता. मात्र सतर्क जवानांनी घुसखोरीच्या प्रयत्नात असणाऱ्या दहशतवाद्यांचा डाव मोडून काढला. 

दहशतवादविरोधी कारवाई करत असताना जवानांनी दहशतवाद्यांना संपवण्यात यश मिळवलं. मात्र या लढाईदरम्यान 4 जवानांना वीरमरण आले आहे. शहिदांमध्ये 1 मेजर आणि 3 जवानांचा समावेश आहे. 

उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये भारतीय लष्करानं दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. यामध्ये जवानांनी 2 दहशतावाद्यांचा खात्मा केला. या कारवाईनंतर नियंत्रण रेषेजवळील परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशिरा काही दहशतवादी घुसखोरी करण्याच्या प्रयत्न करत होते. याबाबतची माहिती मिळताच जवान सतर्क झाले आणि परिसराला घेराव घालत शोधमोहीम सुरू करण्यात आली होती.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई, 4 जवानांना वीरमरण...

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य