Wednesday, 12 December 2018

#NationalHandloomDay : राष्ट्रीय हातमाग दिनाचे महत्व...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

७ ऑगस्ट 2015 हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. यंदाचं हे चौथ वर्ष असून आज देशभरात राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करण्यात येत आहे.

हातमाग उद्योगाच्या महत्त्व आणि देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासामध्ये त्याचा वाटा आहे याबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा करण्याचा हेतू आहे.

लक्षणीय म्हणजे 7 ऑगस्ट 1905 रोजी स्वदेशी चळवळीचा औपचारिक उद्घाटन कोलहात्यातील टाउनहाल येथे एका जाहीर सभेत झाला. या चळवळीत घरगुती उत्पादनांचे पुनरुज्जीवन आणि उत्पादन प्रक्रिया समाविष्ट होते. 

2,9 जुलै, 2015 रोजी या आंदोलनाच्या स्मृत्यर्थ भारत सरकारद्वारे राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून दरवर्षी 7 ऑगस्ट रोजी घोषित केले होते.हातमाग व्यवसायचा इतिहास 

 • पूर्वीच्या काळी शेतीसोबतच विणकाम हा महत्त्वाचा व्यवसाय होता.
 • नगर जिल्ह्याला निजामशाहीच्या काळापासून हातमाग व्यावसायिकांचा इतिहास आहे.
 • 'संगमनेरी बांड’ नावाचा येथील दणगट वाण महाराष्ट्रात प्रसिद्ध होता.
 • पद्मशाली, कोष्टी, स्वकूनसाळी अशा विविध समाजांचा हातमागावर कपडे विणणे, हा परंपरागत व्यवसाय बनला.
 • पूर्वी या समाजातील लोक उपरणे-धोतर, लुगडी, तलम रेशमी कलात्मक वस्त्र विणून देत होती.
 • त्याबद्दल त्यांना धान्य, जीवनाश्वयक वस्तू मिळत होत्या. 
 • या धंद्यात काही ठराविक समाजांनी वर्चस्व मिळवले होते. 
 • हातमाग व्यवसायात असणारे पद्मशाली समाजामधील लोक आंध्र प्रदेश, तेलंगण या राज्यात होते. 
 • परंतु, काळाच्या ओघात हा समाज तेलंगणातून स्थलांतरीत झाला. 
 • महाराष्ट्रातही नांदेड, परभणी, जालना, अहमदनगर, सोलापूर, पुणे अशा शहरांत हा समाज आला. 
 • मात्र, दुसऱ्या शहरात येऊनही त्यांनी हातमागाचा व्यवसाय सुरू ठेवला.
loading...

Top 10 News

राशी भविष्य