Thursday, 17 January 2019

इंडोनेशियात भूकंप, 82 जण ठार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

इंडोनेशिया भूकंपाच्या तीव्र धक्क्याने हादरले आहे. रविवारी रात्री इंडोनेशियातील लोम्बोक बेटाला 7 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपामध्ये जीवितहानी झाली असून आतापर्यंत 82 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.तर 100हून अधिक जण जखमी आहेत. 

या दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या भूकंपाच्या धक्क्यामुळे त्सुनामी लाटा निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे समुद्रकिनाऱ्याजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

  • लोम्बोक आयलँडजवळ या भूकंपाचा केंद्रबिंदू दाखवण्यात आला आहे.  
  • या भूकंपामुळे अनेक इमारतींचं नुकसान झालं असून, स्थानिक लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
  • भूकंपामुळे नुकसान झालेल्या इमारतीमध्ये विमानतळ टर्मिनल इमारतीचाही समावेश आहे.
  • भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, ते बाली द्विपसमूहापर्यंत जाणवले.
  • या भूकंपानंतर त्सुनामीचाही इशारा देण्यात आला होता. परंतु आता त्सुनामी येणार नसल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे.
  • तीन गावांच्या समुद्रकिना-यावर फक्त 15 सेंटीमीटरपर्यंत लाटा उसळल्यानंतर सुनामीचा इशारा रद्द करण्यात आला आहे.

 

 

 
 
loading...

Top 10 News

राशी भविष्य