Tuesday, 22 January 2019

इम्रान खानच्या शपथविधी कार्यक्रमाला या भारतीयांना अामंत्रण

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

पीटीआय पक्षाचे प्रमुख आणि माजी क्रिकेटर इम्रान खान 11 ऑगस्ट रोजी पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी कार्यक्रमाला त्यांनी भारतीयांनाही आमंत्रित केलं आहे.

या आमंत्रण यादीत त्यांनी प्रसिद्ध बॉलिवुड स्टार आमिर खान आणि दिग्गज माजी क्रिकेटर सुनील गावस्कर, कपिल देवसह नवजोत सिंग सिद्धू यांना निमंत्रण पाठवले आहेत. 25 जुलै रोजी झालेल्या निवडणुकीत पाकिस्तान तहरीक ए-इन्साफला 116 जागा मिळाल्या. तसेच हा पक्ष पाकिस्तानचा सर्वात मोठा राजकीय पक्ष बनला.

मीडियाचे तर्क चुकले - 

इम्रान खान आपल्या शपथविधी समारंभात सार्क देशांच्या नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देणार अशी चर्चा होती. पीटीआयचे प्रवक्ते फवाद हुसैन यांनी नुकतेच एक ट्वीट केले आहे. त्यानुसार, "माध्यमांकडून अनेक प्रकारची भाकिते वर्तवली जात आहेत. त्यामध्ये पंतप्रधान शपथ विधी सोहळ्यात परदेशी नेत्यांना बोलावणार अशी चर्चा केली जात आहे. परंतु, माध्यमांचा हा तर्क खोटा आहे. यासंदर्भातील निर्णय परराष्ट्र मंत्रालयाशी चर्चा झाल्यानंतरच घेतला जाईल." मोदींनी सुद्धा इम्रान यांना दूरध्वनीवरून त्यांच्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.

पाकिस्तान निवडणूक : इम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान ?

 

 

 

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य