Sunday, 20 January 2019

24 तासांनंतर बोअरवेलमधून चिमुकलीची सुटका...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

बिहारमधल्या मुंगेर जिल्ह्यामध्ये 3 वर्षाची चिमुकली बोअरवेलमध्ये पडल्याने सर्वत्र खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची टिम घटनास्थळी दाखल झाली होती. तब्बल 24 तासांनंतर बचावकार्य अखेर थांबवण्यात आले आहे. बोरवेलच्याच बाजूला असलेल्या 50 फूट खोलीच्या समांतर खड्ड्यातून तिला बाहेर काढण्यात एनडीआरएफची टिमला यश आले आहे. 

काल दुपारी 4 वाजल्यापासून ही चिमुकली त्यात अडकली असून तिला त्यातून बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु होते.

काय झालं नेमकं?

सना असं त्या चिमुकलीचं नाव असून ती आपल्या वडिलांसोबत पाहुण्यांकडे आली होती. दुपारच्या वेळेत सना घरासमोर खेळता खेळता 110 फूटाच्या बोअरवेलमध्ये पडली.

बचावासाठी असे प्रयत्न - 

आॅक्सिजनचा पुरवठा करणारी पाईप बोअरवेलमध्ये सोडण्यात आली असून तिच्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवण्यात येत होती.

पोलिसांच्या माहितीनुसार संबंधित मुलीला बोअरवेलमधून बाहेर काढण्यास 24 तासांचा कालावधी लागू शकतो अशी शक्यता वर्तवली जात होती.

ती सुरक्षीत असून चांगला प्रतिसाद देत होती. बोरवेलच्याच बाजूला 50 फूट खोलीचा समांतर खड्डा खोदला.

घटनास्थळी डॉक्टरांचा एक चमूही हजर झाला होता. या मुलीला वाचवण्यासाठी बचाव पथकाने केलेल्या प्रयत्नांनंतर त्यांना अखेर यश आले.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य