Saturday, 17 November 2018

पाकिस्तान निवडणूक : इम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान ?

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 
वृत्तसंस्था, नवी दिल्ली 

सार्वत्रिक निवडणुकांसाठी बुधवारी पाकिस्तानात मतदान झालं. यानंतर रात्रीपासून मतमोजणीला सुरुवात झाली आणि त्यामध्ये सुरुवातीपासूनच इम्रान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षानं आघाडी घेतली आहे. 

यासाठी मतमोजणी सुरु असून सकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास काही कल हाती आले. त्यात इम्रान खान यांचा तहरीक-ए-इन्साफ पक्ष (पीटीआय) ११४ जागांवर आघाडीवर आहे, तर माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा पीएमएल-एन पक्ष ६३ जागांवर आघाडीवर आहे.

पाकिस्तानात काल 272 जागांसाठी मतदान झालं. आतापर्यंतच्या मतमोजणीनुसार इम्रान खान यांच्या पीटीआयला 119 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग (पीएमएल) दुसऱ्या क्रमांकावर आहे.

पीएमएल 56 जागांवर आघाडीवर आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टी तिसऱ्या स्थानावर आहे.

पीपीपी 34 जागांवर पुढे आहे. याशिवाय 58 जागांवर इतर पक्षांचे उमेदवार आघाडीवर आहेत.

लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईददेखील निवडणुकीच्या आखाड्यात उतरला आहे. मात्र त्याच्या मिल्ली मुस्लिम लीगला एकाही जागेवर आघाडी मिळालेला नाही.

 

नवाज शरीफ यांचा लहान भाऊ शहबाज शरीफ यांनी पत्रकार परिषद घेत इम्रान खान यांच्यावर गंभीर आरोप केले.

 • मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून पीटीआयनं आघाडी घेतली.
 • यानंतर नवाज शरीफ यांच्या पीएमएल पक्षाकडून निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला.
 • पाकिस्तानात आता झालेली निवडणूक ही इतिहासातील सर्वात अप्रामाणिकपणे लढवण्यात आलेली निवडणूक असल्याचं शरीफ म्हणाले.
 • आम्ही या निवडणुकीचे निकाल स्वीकारत नाहीत. आम्हाला ते मान्य नाहीत, असंही त्यांनी म्हटलं.
 • 'इम्रान खान यांनी गैरमार्गाचा वापर करुन आघाडी घेतली आहे. आमच्या अनेक कार्यकर्त्यांना मतमोजणी सुरु असलेल्या ठिकाणांवरुन बाहेर काढण्यात आलं आहे. मतमोजणीत मोठा घोटाळा करण्यात आला आहे,' असा आरोप शहबाज शरीफ यांनी केला. 

 

इम्रान खानच्या जीवनातील घडामोडी -  

 • इम्रान खान यांचा जन्म 1952 ला लाहोरच्या पश्तुनी कुटुंबातला
 • लाहोरच्या एचिसनच्या कॉलेजमधून शिक्षण
 • वयाच्या 13 व्या वर्षापासून क्रिकेट खेळण्यास सुरुवात
 • 1971 - वयाच्या 18 व्या वर्षी इंग्लंडच्या विरुद्ध खेळला पहिला सामना
 • 1975 - लंडनच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएशन पूर्ण
 • तत्वज्ञान, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र विषयात पदवी
 • 1982 ते 1992 - पाकिस्तान क्रिकेट टीमचे कर्णधार
 • 1992 - कर्णधार असताना पाकिस्तानने विश्वचषक जिंकला
 • 1996 - 'तहरिक ए इन्साफ' पक्षाची स्थापना
 • 2002 - पंजाबच्या मियांमधून पहिल्यांदा जागा जिंकली
 • 2013 - 'तहरिक ए इन्साफ'ने पहिल्यांदा खैबर पख्तुन्ख्वा प्रांतात सरकार स्थापन
 • यावेळी इम्रान खान यांच्याकडून पाकिस्तानच्या नवनिर्मितीची घोषणा
 • पाकिस्तानी जनतेला भ्रष्टाचारमुक्ती देण्याचे आश्वासन
 • पाकिस्तानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार
 • क्रिकेटनंतर त्यांचा सामाजिक कार्यात सहभाग
 • इम्रान खान यांच्या आईचे कर्करोगाने निधन
 • पाकिस्तानात कर्करोगग्रस्तांसाठी मोठ्या रुग्णालयाची स्थापना

शरीफ, मरियम पाकिस्तानात पोहचताच अटक

नवाझ शरीफ यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात

loading...

Top 10 News

राशी भविष्य