Thursday, 17 January 2019

अविश्वास प्रस्तावावर मोदी सरकारने जिंकला विश्वास...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्ठा, नवी दिल्ली

नरेंद्र मोदी सरकारविरोधात दाखल झालेला अविश्वास प्रस्ताव लोकसभेने 325 विरुद्ध 126 अशा मोठ्या फरकाने फेटाळून लावला. त्यामुळे संसदेच्या कनिष्ठ सभागृहात मोदी सरकारकडे अद्यापही भक्कम पाठबळ असल्याचे समोर आले आहे.

अविश्वास प्रस्तावादरम्यान राहुल गांधींनी केलेल्या जोरदार भाषणामुळे भाजपाच्या गोटात खळबळ उडाली होती. राफेल करारापासून ते मॉब लिचिंगपर्यंत सर्व प्रकरणामध्ये राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.

तसेच मोदी आणि अमित शाह या भाजपातील सध्याच्या सर्वशक्तिमान नेत्यांवर आरोपांच्या फैरी झाडत त्यांनी सभागृहात सत्ताधाऱ्यांची कोंडी केली.

मात्र लोकसभेचा विश्वास मोदी सरकारने जिंकला असला तरी त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे करण्यात काँग्रेससह विरोधक यशस्वी झाले आहेत. त्यामुळे विश्वास जिंकला तरी पुढील लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी मोदी आणि भाजपाचे टेन्शन वाढले आहे. ॉ

राहुल गांधींची झप्पी झाली ट्रोल...

लाेकसभेत घडली एेतिहासिक घटना,आधी हल्ला मग गळाभेट...

नरेंद्र मोदींच्या अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत चर्चा सुरु...

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य