Tuesday, 22 January 2019

नेल्सन मंडेला यांची आज 100 वी जयंती...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

१८ जुलै १९१८ला जन्मलेल्या मंडेलांनी साम्राज्यवाद, गरिबी आणि वंशभेदाचं उच्चाटन करण्यासाठी जो अतुलनीय लढा दिला त्याचं खरंतर शब्दांत वर्णन करणं शक्य नाही.  महात्मा गांधी यांच्यानंतर जगभरात दुसरे गांधी म्हणून अहिंसेचे पुजारी नेल्सन मंडेला अशीही त्यांची ओळख होती.

नेल्सन मंडेला हे एकमेव परदेशी नागरिक आहेत, जे 'भारतरत्न' पुरस्काराचे मानकरी आहेत.

नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष तसेच वर्णद्वेष आणि वर्णभेद विरोधीमोहिमेतील आदर्श व्यक्तिमत्व. वयाच्या ९५व्या वर्षी नेल्सन मंडेला यांचे निधन झाले. 

नेल्सन मंडेला यांनी कायम देशाला उच्च विचारसरणी राखण्याची शिकवण दिली. त्यांच्या या वर्णद्वेष आणि वर्णभेद विरोधी मोहिमेमुळे त्यांच्या विरोधातील नेत्यांनी त्यांना तुरुंगात डांबले होते. नेल्सन मंडेला यांना तब्बल २७ वर्षे तुरुंगवास सहन करावा लागला. 

मंडेला काळाच्या पडद्याआड गेले असले तरी (५ डिसें. २०१३) त्यांनी आयुष्यभर जोपासलेली आदर्श जीवनमूल्ये संपूर्ण मानवजातीला सतत प्रेरणादायी ठरतील.

त्याग, जिद्दीची पाच वैशिष्ट्ये - दृढ निश्चय, संयमी, सडेतोड, विनम्र आणि प्रेमळ 

धर्म-वर्ण, जातीपाती यांच्या आधारे माणसा-माणसांमध्ये कृत्रिम भिंती उभ्या करणाऱ्या प्रवृत्तींविरुद्ध संघर्ष करून सर्व मानवांमध्ये बंधुत्वाची, मित्रत्वाची भावना निर्माण करणे, हीच या महामानवाला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल!

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य