Tuesday, 22 January 2019

कर्जबुडव्या विजय माल्याचं मोदींना पत्र अन् म्हणाला...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, दिल्ली

कर्जबुडव्या उद्योगपती विजय माल्याने कर्ज न चुकवण्यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे.

बँकांचे थकवलेले पैसे परत करण्याचा आपण पूर्णपणे प्रयत्न करत आहोत, असे माल्याने आपल्या पत्रात म्हटले आहे. मात्र आपल्याला बँकात घोटाळे करणाऱ्यांचा पोस्टर बॉय बनवले जात आहे, असेही माल्या आपल्या पत्रात म्हणतो. 

सध्या इंग्लंडमध्ये वास्तव्यास असलेल्या माल्याने पत्रक प्रसिद्ध केले आहे. आपण २०१६मध्येच नरेंद्र मोदी आणि वित्तमंत्री अरुण जेटली या दोघांनाही कर्ज बुडल्याप्रकरणी पत्र पाठवलं होतं, मात्र अद्याप त्या दोघांपैकी कोणीही त्या पत्राला उत्तर दिलेलं नाही, असं विजय मल्ल्या याचं म्हणणं आहे.

”मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री दोघांनाही १५ एप्रिल २०१६मध्येच पत्र पाठवलं होतं.

हे पत्र आता मी प्रसिद्ध करत आहे. मात्र, या पत्राचं मला काहीही उत्तर मिळालेलं नाही.

मंत्री आणि माध्यमं माझ्यावर असे आरोप लावले आहेत की जसं मी किंगफिशर एअरलाईन्सचं ९ हजार कोटींचं कर्ज घेऊन फरार झालो आहे.

काही बँकांनी तर मला जाणीवपूर्वक कर्ज बुडवेगिरी करणारा घोषित करून टाकलं आहे.” असं मल्ल्या याचं म्हणणं आहे.

त्याने त्या प्रेस रिलीजच्या प्रतींचे फोटो ट्वीट केले असून त्यात हा दावा केला आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य