Wednesday, 19 December 2018

आध्यात्मिक गुरु भैय्यूजी महाराज यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

अध्यात्मिक संत ‘भैय्यूजी महाराज’ यांनी इंदूरमधील अपल्या राहत्या घरी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. इंदूरमधील बॉम्बे रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भैय्यूजी महाराजांच्या या अकाली निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे.

भैय्यूजी महाराजांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार असून सकाळी 9 ते साडेबारा वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव सूर्योद्य आश्रमात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

मृत्यूपूर्वी भैयू महाराजांनी इंग्रजी भाषेत एक पानी सुसाईड नोट लिहिली होती. सुसाईड नोट सापडली असून, आपल्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार न धरण्याचे त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.

कुटुंबाची काळजी कुणीतरी घ्या. ताण असह्य झाला आहे. खूप थकलोय. मी सोडून जात आहे, असे भय्यू महाराज यांनी सुसाईड नोटमध्ये म्हंटले आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य