Tuesday, 13 November 2018

आध्यात्मिक गुरु भैयुजी महाराज यांची आत्महत्या...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, इंदूर

आध्यात्मिक गुरु भैयूजी महाराज यांनी इंदूरमधील आपल्या राहत्या घरी स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या केली आहे. इंदूरमधल्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भैयुजी महाराज हे स्वयंघोषित अध्यात्मिक आणि राजकीय गुरु होते.

भैयूजी महाराज यांनी आत्महत्या नेमकी का केली , याबाबतची माहिती अजून कळू शकलेली नाही.

भैयूजी महाराज यांना ‘राष्ट्रसंत’ म्हणून संबोधलं जातं. अध्यात्मिक क्षेत्रात ते प्रसिद्ध होते. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात ते नेहमीच सक्रीय असायचे राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांसोबत त्यांची उठ बस असायची. माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख,मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह अनेक दिग्गज त्यांच्याकडे जात असत. 

काही दिवसांपूर्वी शिवराज सिंह सरकारने त्यांना मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. भय्यू महाराज यांच्या आश्रमात अनेक व्हीआयपी व्यक्ती येत असतं. कलाकार, गायक, उद्योगपती, राजकारण इत्यादी अनेक दिग्गज व्यक्ती भय्यू महाराजांच्या आश्रमात येत असे.

 

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य