Friday, 18 January 2019

वंशभेदावरून भारतीय इंजिनीअरची हत्या करणाऱ्याला जन्मठेप

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

भारतीय इंजिनीअर श्रीनिवास कुचिभोतला यांची हत्या करणाऱ्या अमेरिकन नौदल सैनिकाला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दोन वर्षांपूर्वी 2 वर्षांपूर्वी 22 फेब्रुवारी रोजी वंशभेदावरून कुचिभोतला यांची हत्या करण्यात आली होती. 

अॅडम डब्ल्यु पुरिंटन असे या 52 वर्षीय मारेकऱ्याचे नाव आहे. 'माझ्या देशातून बाहेर निघून जा,' असं अॅडमने गोळ्या झाडण्यापूर्वी श्रीनिवास आणि त्याच्या मित्राला म्हटलं होतं. श्रीनिवास आपल्या मित्रासोबत ओलाथे शहरातील एका बारमध्ये होते. तेथे अॅडमने केलेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला, तर मित्र आलोक मदसानी जखमी झाला होता. त्यांच्या मध्ये पडलेले आणखी एक नागरिक इयान ग्रिलट हेदेखील जखमी झाले होते. 

याचवर्षी मार्च महिन्यात अॅडम पुरिंटनने कंसास कोर्टासमोर आपल्या गुन्ह्याची कबुली दिली होती. त्यावेळी शिक्षेच्या सुनावणीसाठी कोर्टाने 4 मे ही तारीख दिली होती. या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू झाली होती, पण तेव्हा पुरिंटन स्वत:ला निर्दोष म्हणवत होता. श्रीनिवास कुचिभोतलाची हत्या आणि अन्य दोन जणांच्या हत्येचा प्रयत्न असे आरोप पुरिंटनवर होते. 

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य