Wednesday, 19 December 2018

तुमच्या डोळ्यांना थक्क करणारा चीनचा ड्रोन फेस्टिवल

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली 

एखाद्या फेस्टिवलचा उल्लेख केला की आपण त्या फेस्टिवलचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं करतो. मात्र, जेव्हा तुम्ही चीनमधला हा ड्रोन फेस्टिवल पाहाल तर थक्क व्हाल, चीनच्या इहांग कंपनीने ड्रोन फेस्टिवलचं आयोजन केलं होतं. चीनच्या शीयान या शहरात या फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी तब्बल 1374 ड्रोन या फेस्टिवलमध्ये लॉन्च करण्यात आले होते, या आधी एकाच वेळी जास्त ड्रोन उडवण्याचा विक्रम इंटेल कंपनीच्या नावावर होता.

इंटेलनी 1218 ड्रोन उडवण्याचा विक्रम केला होता. हा विक्रम आता इहांग कंपनीच्या नावावर झाला असून. ड्रोनवर एलईडी लाईट बसवून त्यांना नियंत्रित करून या अनोख्या शोमध्ये शानदार प्रदर्शन करण्यात आलं आहे. चीनमधला हा ड्रोन फेस्टिवल म्हणजे तुमच्या डोळ्यांचे पारणं फेडणारा एक अविस्मरणीय क्षण आहे.

Pics: चीनच्या ड्रोन फेस्टिवलचे थक्क करणारे दृश्य

loading...

Top 10 News

राशी भविष्य