Sunday, 18 November 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दोन दिवसीय दौऱ्यावर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन देशाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. मोदींसाठी चीनच्या वादकांनी चक्क हिंदी गाणे वाजवून त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मोदींनी हास्य करुन वादकांना दाद दिली. त्यांच्याबरोबर चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी नौकाविहारही केलं. या भेटीत दहशतवादापासून ते आर्थिक संबंध वाढविण्यापर्यंत अनेक विषयावर चर्चा झाली असली तरी डोकलामच्या विषयावर या भेटीत काहीच चर्चा झाली नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. अत्यंत महत्त्वाच्या या भेटीत दोन्ही देशांच्या प्रमुखांनी डोकलामवर चर्चा न केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या दरम्यान झालेल्या चर्चेची माहिती देण्यासाठी परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. त्यात त्यांनी हा खुलासा केला. या बैठकीत सीमेवरील वाढत्या तणावावर चर्चा करण्यात आली. सीमेवरील तणाव दूर करण्यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली. दोन्हीकडच्या लष्कराला स्ट्रॅटेजिक गाइडन्स देण्याचेही ठरल्याचं विजय गोखले यांनी सांगितलं. मात्र यावेळी चीनच्या बेल्ट इन रोड प्रोजेक्ट आणि डोकलामवर कोणतीच चर्चा झाली नसल्याचं गोखले यांनी स्पष्ट केलं. चीनच्या बेल्ट अँड रोड प्रोजेक्ट अंतर्गत बनणारा चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर पाकव्याप्त काश्मिरातून जातो. त्याला भारताने आधीच आक्षेप नोंदवलेला आहे. मात्र या विषयावर या बैठकीत चर्चा करण्यात आलेली नाही.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य