Monday, 19 November 2018

सलमान आजही तुरुंगातच, जामीन अर्जावर उद्या सुनावणी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, जोधपूर

काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला आज दिलासा मिळू शकला नाही. सलमानच्या जामीन अर्जाचा निर्णय उद्यापर्यंत राखून ठेवण्यात आलाय. त्यामुळे सलमान खानचा आजचा मुक्काम हा जेलमध्येच असणार आहे.

आज सकाळी 10.30 वाजता जोधपूर सत्र न्यायालयात न्यायाधीश रव्रींद्र कुमार जोशींसमोर सुनावणीला सुरुवात झाली. सलमानचे वकिल आनंद देसाई यांनी सलमानच्या जामिनासाठी 51 पानांची याचिका दाखल केली. सलमानला जामीन मिळावा यासाठी त्यांनी अर्धातास युक्तीवाद केला. सरकारी वकिलांनीही आपली बाजू लावून धरली. त्यानंतर न्यायाधीशांनी या प्रकरणाची पोलीस तपासाची केस डायरी मागवून घेतलीये. तोपर्यंत सलमानचा निर्णय राखून ठेवण्यात आलाय. उद्या सकाळी 10.30 वाजता पुन्हा या निर्णय सुनावला जाणार आहे.

‘हम साथ साथ है’ या सिनेमाच्या शुटींगदरम्यान सलमान खान त्या रात्री सैफ अली खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू, नीलम यांच्यासह शिकारीला निघाला होता. यावेळी सलमानने संरक्षित वन्य जीवांच्या यादीत असलेल्या दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. याशिवाय विविध दोन ठिकाणी काळवीटाची शिकार केल्याचाही त्याच्यावर आरोप करण्यात आला होता. त्यामुळे सलमानवर एकूण चार खटले दाखल आहेत.

याप्रकरणी इतर कलाकारांची निर्दोष म्हणून सुटका झाली तर सलमानला 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. सलमानला जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य