Thursday, 17 January 2019

काळवीट शिकार प्रकरणी सलमानला 5 वर्षांची शिक्षा, जोधपूर जेलमध्ये होणार मुक्काम

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, जोधपूर

काळवीट शिकार प्रकरणी बॉलिवूडच्या टायगरला 5 वर्षांची शिक्षा जोधपूर कोर्टाने सुनावली आहे. काळवीट शिकार प्रकरणी बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू, नीलम यांच्यावर देखील हा खटला सुरु होता. पण, जोधपूर न्यायालयाने त्यांची निर्दोष म्हणून मुक्तता केलीय.

‘हम साथ साथ है’ या सिनेमाच्या शुटींगदरम्यान सलमान खान त्या रात्री सैफ अली खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू, नीलम यांच्यासह शिकारीला निघाला होता. यावेळी सलमानने संरक्षित वन्य जीवांच्या यादीत असलेल्या दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. याशिवाय विविध दोन ठिकाणी काळवीटाची शिकार केल्याचाही त्याच्यावर आरोप करण्यात आला होता. त्यामुळे सलमानवर एकूण चार खटले दाखल आहेत.

याप्रकरणी इतर कलाकारांची निर्दोष म्हणून सुटका झाली तर सलमानला 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. सलमानला जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य