Sunday, 18 November 2018

अहिलच्या बर्थडे पार्टीत सलमानची कॉपी करत अर्पिता थिरकली जॅकलिनसोबत

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

बॉलीवूडचा दबंग खान अर्थात अभिनेता सलामान खानचा भाचा अहिल शर्मा याचा वाढदिवस 30 मार्च रोजी दुबईतील Cipriani Yas या आयलॅन्डवर खान-शर्मा कुटुंबियांसह धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.या बर्थडे पार्टीत सलमानच्या ‘जुम्मे की रात’ या गाण्यावर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सोबत अर्पिता थिरकतानाचा व्हिडीओ सोशल मिडीआवर चांगलाच व्हायरल होत आहे.

सलमानच्या गाण्यात एक तरी अनोखी स्टेप असते. ‘किक’ सिनेमातील ‘जुम्मे की रात’ या गाण्यातल्या सलमानच्या ‘हुक’ स्टेपची कॉपी करत अर्पिता खान आणि बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस बेधुंद होउन नाचताना दिसल्या.या डान्सचा व्हिडिओ सोशल मिडिआवर सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे.ahil_bdy_party-arpita.jpg

रेस-3 सिनेमाचे दिग्दर्शन रेमो डिसूझा करीत असून ईदच्या दिवशी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात सलमान-जॅकलिनसह, अनिल कपूर, बॉबी देओल, डेजी शाह प्रमुख भूमिकेत दिसणार आहे

loading...

Top 10 News

राशी भविष्य