Friday, 18 January 2019

भारतावरील धोका टळला, चीनचं स्पेस स्टेशन पॅसिफिक महासागरात

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

चीनचं टीयाँगाँग स्पेस स्टेशन सोमवारी पहाटे पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. या स्पेस स्टेशनच्या संभाव्य मार्गात मुंबईसह महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, बंगालचा उपसागर अशा पट्ट्याचा समावेश आहे. मात्र, त्याचा वेग पाहता, ते नेमकं कुठं पडेल, याचा अंदाज बांधणं आता तरी कठीण आहे.

आज पहाटे चार वाजून 55 मिनिटांनी या स्पेस स्टेशननं म्हणजेच प्रयोगशाळेनं पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर परिसराबाबत अंदाज बांधण्यात आला होता. अखेर भारतावरील धोका टळला आणि चीनचं हे स्पेस स्टेशन पॅसिफिक महासागरात केसळले. 2011 मध्ये हे स्पेस स्टेशन लाँच करण्यात आलं होतं. मात्र, 2016 मध्ये चीनचा त्याच्याशी संपर्क तुटला. तेव्हापासून ते अंतराळात कुठल्याही नियंत्रणाशिवाय फिरत होतं.

loading...

Top 10 News

राशी भविष्य