Wednesday, 16 January 2019

भाजपचे चाणाक्ष फसले; म्हणाले, ‘येडियुरप्पा सरकार सर्वाधिक भ्रष्टाचारी’

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

 वृत्तसंस्था, दिल्ली

आज निवडणूक आयोगाने कर्नाटकातील निवडणूकांची घोषणा केली आहे. याच निवडणूकांसंदर्भात अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर हल्ला चढवत असतानाच त्यांची जीभ घसरली. ते म्हणाले, ‘भ्रष्टाचारासाठी कोणत्या सरकारला बक्षील द्यायचे असेल तर ते येडियुरप्पा सरकारला द्यायला हवं.’त्याचवेळी त्यांच्या शेजारी असणाऱ्या व्यक्तीने शहांना त्यांची चूक लक्षात आणून दिली. त्यानंतर शहांनी सारवासारव केली खरी परंतु तो पर्यंत व्हायचं ते नुकसान झालेलं होतं. यावेळी शहांना खरं तर काँग्रेसच्या सिध्दरामय्या सरकारवर निशाणा साधायचा होता. पण त्यांच्या तोंडून चुकून सिध्दरामय्यांच्या ऐवजी येडियुरप्पा यांचं नाव निघून गेलं. विशेष म्हणजे येडियुरप्पा हे या निवडणूकीत कर्नाटक भाजपचा चेहरा आहेत.

काँग्रेसनंही या संधीचा फायदा घेत भाजपवर निशाणा साधला. राहुल गांधी यांनी ट्विट करत अमित शहा ‘खरं’च बोललेत असा उपरोधिक टोला लगावलाय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य