Tuesday, 20 November 2018

आशियातील सर्वात मोठे ट्यूलिप गार्डन पर्यटकांसाठी खुले

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, जम्मू काश्मीर

जम्मू काश्मीरमधील दल सरोवराच्या किनाऱ्यावर असलेले आशियातील सर्वात मोठे ट्यूलिप गार्डन रविवारपासून पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलं आहे. हे गार्डन 15 हेक्टर क्षेत्रात पसरले आहे. या गार्डनमध्ये 53 प्रकारची जवळपास 10 लाखांहून अधिक ट्यूलिप येत्या महिन्याभरात उमलणार आहे. दहा वर्षांत आशियातील सर्वात मोठ्या ट्यूलिप गार्डनचा मान या गार्डनला मिळाला आहे.

Tulip-3.jpg

या आठवड्याच्या सुरुवातीलाच ट्युलिप गार्डनमधल्या 20 टक्के रोपट्यांना बहार आल्याचे रोपवाटिका विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

tulip-4.jpg

काश्मीर खोऱ्यातील पर्यटनाच्या दृष्टीने ट्यूलिप गार्डन खूप महत्त्वाचे आहे. दरवर्षी लाखो लोक देशभरातूनच नाही तर परदेशातूनही पृथ्वीवरील हे नंदनवन पाहण्यासाठी काश्मीरमध्ये येतात.

loading...

Top 10 News

राशी भविष्य