Tuesday, 20 November 2018

कर्नाटकातील निवडणूकांचं बिगूल वाजलं ; वेळापत्रक जाहीर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, दिल्ली

राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत कर्नाटकातील निवडणूकांचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. कर्नाटकात विधानसभेच्या 224 जागांसाठी 12 मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर 15 मे रोजी निकाल जाहीर होतील. निवडणूक आयोगाच्या या घोषणेनंतर कर्नाटकात आता आचारसंहिता लागू झालेली आहे.

मतदान ईव्हीएम मशिनद्वारेच होणार असले तरी व्हीव्हीपॅट प्रणालीचाही सर्वत्र अवलंब करण्यात येणार आहे, अशी महत्वपूर्ण घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त ओपी रावत यांनी केलीय. यामुळे आपण कोणत्या पक्षाला मतदान केले याची स्लिप मतदारांना मिळणार आहे. या निवडणूकीत एकूण 4 कोटी 96 लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील.

उमेदवार आपला उमेदवारी अर्ज 24 एप्रिलपर्यंत भरू शकतील. त्यानंतर 26 एप्रिल या अर्जांची छाननी होईल. तर 27 एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.

सध्या 122 आमदारांसह काँग्रेस येथे सत्तेवर आहे. काँग्रेस आणि भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणूकीत मतदार कोणाला कौल देतात, हे पाहणं औत्सुकाचं ठरणार आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य