Tuesday, 20 November 2018

स्मिथसह डेव्हिड वॉर्नरवर आजीवन बंदी ?

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

वृत्तसंस्था, दिल्ली

ऑस्ट्रिलियन टीमने केलेल्या ‘बॉल छेड़छाड‘ प्रकरणाने क्रीडा जगत हादरलं आहे. या प्रकरणात संपूर्ण टीमचाच सहभाग असल्याचंही समोर आलं आहे. यानंतर काल कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या दोघांवर क्रिकेट ऑस्ट्रेलिया अजून कठोर कारवाई करू शकते. कारण या लाजिरवाण्या घटनेमुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटची जगभरात प्रचंड बदनामी झाली आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या नियमानुसार अशा प्रकरणात आजीवन बंदीचीही शिक्षा केली जाऊ शकते. त्यामुळे स्मिथ आणि वॉर्नवर ही कठोर कारवाई होते का, हे पाहावं लागेल.

एकूणच हे प्रकरण ऑस्ट्रेलियातील क्रिकेटसाठी एक भयावह वादळ ठरलं आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य