Thursday, 17 January 2019

रशियात अग्नितांडव; 37 जणांचा होरपळून मृत्यू

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, रशिया

रशियामध्ये सैबेरिया शहरातल्या केमरोव्हो येथील शॉपिंग मॉलमध्ये रविवारी भीषण आग लागली. या आगीत 37 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. तर अनेक जण जखमी झालेत. आगीमध्ये सिनेमागृह, हॉटेल, लहानमोठी दुकाने सर्वच जळून खाक झाले आहेत. या अग्नितांडवातून 120 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलयं.

rashiya3.png

 

आगीमुळे मॉलमध्ये लोक सैरावैरा पळू लागले. या गोंधळात 64 जण हरवल्याची माहिती मिळतेय. यामध्ये 40 पेक्षा जास्त लहान मुंलांचा समावेश आहे. सर्व प्रतम आग मॉलच्या चौथ्या मजल्यावर लागली होती. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अनेक जण स्वत:च्या बचावासाठी मॉलच्या खिडकीतून उडी मारत असल्याचे या व्हिडिओत दिसतयं.

rashiya1.png

रशियाच्या स्थानिक वृतांनुसार मॉलमधील सिनेमा हॉलच्या ठिकाणी आग लागली होती. या भीषण आगीमुळे मॉलचे छत कोसळले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तरीदेखील आग कशामुळे लागली ते पोलिसांना कळू शकलेले नाही.

loading...

Top 10 News

राशी भविष्य