Wednesday, 14 November 2018

उपोषणादरम्यान अण्णांची प्रकृती खालावली, सरकार तोडगा कधी काढणार ?

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

वृत्तसंस्था, दिल्ली

 आज अण्णांच्या उपोषणाचा तीसरा दिवस आहे. यातच आण्णांची प्रकृती खालावली असून त्यांचं तब्बल 3 किलो वजन कमी झालं असल्याचं कळतंय. अण्णांसह त्यांच्या इतरही सहकाऱ्यांची प्रकृती बिघडली आहे.

 जनलोकपाल कायदा आणि शेतीसंदर्भात स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात या प्रमुख मागण्यांसाठी अण्णांनी शुक्रवारपासून दिल्लीच्या रामलीला मैदानात उपोषण चालू केले आहे. यावेळी अण्णांच्या आंदोलनाला अगोदरसारखा प्रतिसाद मिळत नाहीये.

परंतु म्हणून त्यांच्या मागण्यांचं गांभीर्य कमी होत नाही. अण्णांनी याही अगोदर अनेक परिणामकारक आंदोलनं करत सरकारला लोकहिताचे निर्णय घेण्यास भाग पाडलं आहे. आता या आंदोलनावर सरकार कधी व कसा तोडगा काढतं, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य