Monday, 21 January 2019

चारा घोटाळा अंगलट; लालूंना 7 वर्षांची शिक्षा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

देशभरात गाजलेल्या बिहारच्या चारा घोटाळ्यातील दुमका कोषागार प्रकरणात माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयानं 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावलीय. त्याचबरोबर, त्यांना 30 लाखांचा दंडही भरावा लागणार आहे. बिहारमधील लोकसभेची पोटनिवडणूक जिंकल्याचा जल्लोष करणाऱ्या यादव परिवाराला या निकालामुळे मात्र मोठा दणका बसला आहे.

चारा घोटाळ्यातील तीन प्रकरणांमध्ये लालूंना याआधीच दोषी ठरविण्यात आले असून शिक्षाही सुनावण्यात आली आहे. त्यांच्यावरील चौथा आरोप झारखंडमधील दुमका येथील कोषागारातून बेकायदेशीररित्या 3 कोटी 13 लाख रुपये काढल्याचा होता. त्यावरील सुनावणी 5 मार्च रोजीच पूर्ण झाली होती. मात्र, लालूंच्या वतीने वेळोवेळी करण्यात आलेल्या याचिकांमुळे त्यावरील निर्णय रखडला होता. अखेर 19 मार्च रोजी त्यावर सुनावणी होऊन लालूंना दोषी ठरवण्यात आले होत.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य