Sunday, 18 November 2018

सुकमात नक्षलवादी हल्ला, 8 जवान शहीद, सहा जखमी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, सुकम

नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात केंद्रीय राखीव दलाचे (सीआरपीएफ) 8 जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यात सहा जवान गंभीर जखमी झाले असून त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. जवळपास 150 जवानांनी हा हल्ला घडवून आणल्याची माहिती मिळाली आहे.

सुकमा जिल्ह्यातील किस्टाराम कॅंममधून सोमवारी सकाळी साडे सात वाजता 212 बटालियनचे सीआरपीएफचे जवान पेट्रोलिंगसाठी निघाले होते. या भागात नक्षलींनी आधीच आयईडी बॉम्ब पेरुन ठेवले होते. दबा धरुन बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांवर अचानक अंदाधूंद गोळीबार करत आयईडी स्फोट घडवून आणला.

loading...

Top 10 News

राशी भविष्य