Thursday, 17 January 2019

इच्छामरणाविषयी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

इच्छा मरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने परवानगी देत ऐतिहासिक निकाल दिलाय. मात्र, परवानगी देताना काही अटी-शर्तीही ठेवल्या आहेत. न्यायालयाच्या या निकालामुळे मरणासन्न अवस्थेत असलेल्यांना इच्छा मृत्यूचा अधिकार मिळाला आहे.

प्रत्येकाला सन्मानाने मरण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे सांगत न्यायालयाने इच्छा मरणाला परवानगी दिली आहे. केवळ श्वास चालू आहे. म्हणून एखाद्या मरणासन्न व्यक्तीला जिवंत ठेवणे योग्य ठरणार नसल्याचंही न्यायालयाने या निकालात नमूद केलं.

त्यामुळे अंथरुणाला खिळलेले अर्थात जे मरणासन्न आहेत, अशा व्यक्तींना त्यांच्या इच्छेविरुद्ध व्हेंटिलेटरवर ठेवता येणार नाही. जर त्यांनी इच्छा मरणाची मागणी केली, तर तत्कालिन परिस्थिती पाहून त्याबाबत निर्णय घेता येणार असल्याचं आजच्या निकालावरुन स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, या निर्णयाचा दुरुपयोग होऊ नये म्हणून इच्छा मरणाबाबतचे निकष ठरविण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. इच्छा मृत्यूपत्र मॅजिस्ट्रेट समोरच केलं जावं. त्यासाठी दोन साक्षीदार असावेत, असं न्यायालयाने स्पष्ट केलं.

loading...

Top 10 News

राशी भविष्य