Sunday, 18 November 2018

'नीरव मोदी हे देशाबाहेर पळून गेलेले नाहीत', विजय अग्रवाल यांचा दावा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

नीरव मोदी यांनी केलेल्या व्यवहारांसाठी पंजाब नॅशनल बँकेला कोट्यवधी रूपयांचे कमिशन मिळाले. मात्र, आता बँक ही गोष्ट नाकारत आहे. मुळात हा सगळा बँकेचा व्यावसायिक मामला होता. परंतु, त्याला घोटाळ्याचे स्वरूप देण्यात आले, असा आरोप नीरव मोदी यांचे वकील विजय अग्रवाल यांनी केला.

नीरव मोदी हे देशाबाहेर पळून गेलेले नाहीत. त्यांचा व्यवसाय जगभरात पसरलेला आहे. ते व्यावसायिक कारणांसाठी परदेशात असतानाच हे संपूर्ण प्रकरण समोर आले. त्यांचा पासपोर्टही रद्द करण्यात आला आहे. नीरव यांच्या कुटुंबातील काही जणांकडे परदेशी नागरिकत्त्व आहे. त्यामुळे ते बराच काळ भारताबाहेर असतात, असेही अग्रवाल यांनी सांगितले. 

अग्रवाल यांनी मंगळवारी मध्यरात्री प्रसारमाध्यमांना अशी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी या प्रकरणाबाबत अनेक खुलासे केले. त्यांनी म्हटले की, नीरव मोदी यांनी पंजाब नॅशनल बँकेकडून केवळ 280 कोटी रूपयांचेच कर्ज घेतले होते. व्याजाची रक्कम धरून हा आकडा 5000 कोटींपर्यंत जाऊ शकतो. माध्यमांकडून 11,500 कोटी रूपयांचा आकडा सांगण्यात येतोय जो पूर्णपणे खोटा आहे. परंतु, सीबीआयने आपल्या अहवालात मोदीने 280 कोटींचे कर्ज घेतल्याचे म्हटले आहे, असा दावा अग्रवाल यांनी केला. तसेच,  बँकेला मोदी करत असलेल्या व्यवहारांची पूर्णपणे माहिती होती.गेल्या कित्येक वर्षांपासून बँकेला त्यांचा हिस्सा व्यवस्थितपणे मिळत होता, असेही अग्रवाल यांनी म्हटले. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य