Sunday, 20 January 2019

आज सुप्रीम कोर्टात प्रिया प्रकाश वारियार खटल्यावर सुनावणी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

‘ओरु अदार लव्ह’ या मल्ल्याळम सिनेमातील 'मणिक्या मलराया पूर्वी' गाण्यावरुन काही दिवसांपासून वाद निर्माण झाला आहे. अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियारने तिच्याविरोधातील खटला रद्द करण्याची मागणी करत, सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यावर आज सुनावणी होणार आहे. प्रियाच्या ‘ओरु अदार लव्ह’ या मल्ल्याळम सिनेमाचे दिग्दर्शक ओमर अब्दुल वहाब या प्रकरणात अडकले आहेत.

आपल्या मुलभूत अधिकारांचा उल्लेख करत प्रिया आणि ओमर यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कायदेशीर रित्या व्यावसाय करण्याचा मुद्यानुसार प्रत्येकाला अधिकार आहे. तिने सादर केलेल्या या गाण्याचा चुकीचा अर्थ काढल्याचं तिने या याचीकेत म्हटलं आहे.

हैदराबादमध्ये मुस्लिम समाजातील काही तरुणांनी प्रिया वारियर विरोधात फलकनुमा पोलिसात तक्रार दाखल केली होती. 'मणिक्या मलराया पूर्वी' गाण्यातून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप या तरुणांनी केला आहे. तसेच, मोहम्मद पैगंबरांचा अवमान होत असल्याचा दावा तरुणांनी केलेला आहे. प्रियासह चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य