Sunday, 20 January 2019

पून्हा एकदा अफवेनं चेंगराचेंगरी; 9 जण जखमी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, लंडन

लंडनच्या ऑक्सफर्ड सर्कस स्टेशनजवळ दोन संशयितांनी गोळीबार केल्याची अफवा पसरल्यानं तात्काळ स्टेशन रिकामं करतांना प्रवाशांची चेंगराचेगरी होऊन झालेल्या दुर्घटनेत 9 जण जखमी झालेत. मात्र, पोलिसांनी केलेल्या कसून तपासानंतर कोणताही गोळीबार झाला नसल्याचे सांगण्यात आले. ब्लॅकफ्रायडे निमित्ताने शुक्रवारी ऑक्सफोर्ड सर्कस स्टेशन परिसरात लोकांनी खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

ऑक्सफोर्ड सर्कस स्टेशनजवळ गोळीबार झाल्याची खबर मिळताच मेट्रोपॉलिटन आणि ब्रिटन ट्रान्सपोर्ट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रवाशांनाही गोळीबार झाल्याचं खरंच वाटल्याने त्यांनीही धावपळ सुरू केली. त्यामुळे स्टेशन परिसरात झालेल्या या चेंगराचेंगरीत 9 जण जखमी झाले.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य