Wednesday, 16 January 2019

शेतकऱ्यांच्या घोषणाबाजीने दिल्ली हादरली

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

देशभरातील शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी दिल्लीत दाखल झाले असून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. कोल्हापुरातून निघालेली स्वाभिमानी एक्स्प्रेस आज पहाटे चारच्या सुमारास दिल्लीत दाखल झाली असून शेतकऱ्यांच्या घोषणांनी दिल्ली दणाणून गेली आहे.

बोचऱ्या थंडीतही बळीराजा आपल्या मागण्यांसाठी एकवटला असून पार्लमेंट स्ट्रीटवर आंदोलन करत सरसकट कर्जमाफी, पिकांना हमीभाव, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, याचबरोबर सरकारने दिलेल्या आश्वासनाकडे लक्ष वेधण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. खासदार राजू शेट्टीसंह देशभरातील शेतकरी नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नीही दिल्लीतील या आंदोलनात सहभागी झाल्या असून आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य