Thursday, 17 January 2019

माझ्या 'त्या' ऑफरने काँग्रेस घाबरली होती - पंतप्रधान मोदी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, डेहरादून

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केदारनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचं भूमिपूजन करण्यात आलं. त्यांनतर मोदींनी मंदिरात पुजा आणि रुद्राभिषेक केला. यावेळी भाषण करताना मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.

2013 मध्ये केदारनाथमध्ये महाप्रलय आला होता. तेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. तत्कालीन राज्यसरकारला मी केदारनाथचा जीर्णोद्धार करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्याला उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी संमतीही दर्शविली होती. मात्र माझ्या प्रस्तावानं दिल्ली हादरली. घाबरलेल्या काँग्रेसने तत्कालीन उत्तराखंड सरकारवर दबाव टाकला. त्यामुळे उत्तराखंडच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी माझा प्रस्ताव नाकारला, असा गौप्यस्फोट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.

केदारनाथची अवस्था पाहून मी अस्वस्थ झालो होतो. त्यामुळे केदारनाथच्या जीर्णोद्धाराची तयारी दर्शविली होती. पण, माझ्या प्रस्तावाने काँग्रेस हादरली. आम्हाला गुजरातची गरज नाही असं राज्यसरकारला सांगावं लागलं. त्यामुळे मी मागे हटलो.

आता केदारनाथच्या संपूर्ण परिसराचा अत्याधूनिकपणे विकास करण्यात येणार असल्याचे मोदींनी यावेळी सांगितलं.

loading...

Top 10 News

राशी भविष्य