Friday, 18 January 2019

अमेरिकेतील लास वेगासमध्ये गोळीबार : 50 जणांचा मृत्यु, 200 हून अधिक जण जखमी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, लास वेगास

 

अमेरिकेतील लास वेगासमध्ये रविवारी मध्यरात्री उशीरापर्यंत चालणाऱ्या एका म्यूझिक फेस्टिवलमध्ये अचानक फायरिंग झाली. एकाएकी झालेल्या या फायरिंगमुळे सगळीकडेच गोधळाचे वातावरण निर्माण झाले. या गोळीबारात 50 अमेरिकी नीगरिकांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

 

म्यूझिक फेस्टिवल हे मंडालय बाय रिजॉर्टमध्ये सुरु होते. रिजॉर्ट शेजारी असलेल्या एका हॅाटेलच्या 32 व्या फ्लोअरवरुन एका इसमाने या फेस्टिवलमधल्या लोकांवर ऑटोमैटिक राइफलने फायरिंग केले. या हॅाटेल आणि रिजॉर्टमध्ये साधारण 500 मीटरचे अंतर आहे.

 

मंडालय बाय रिजॉर्टला लक्ष्य केल्यासंबधीची खबर पोलिसांना आधीच मिळाली असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. गोळीबारात जखमी झालेल्यांची परिस्थिती अतिशय गंभीर आहे.

हल्ल्यादरम्यान फेस्टिवलमध्ये साधारण 40,000 लोक हजर होते.        

 

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे वेगासमधल्या मैक्कैरेन इंटरनॅशनल एअरपोर्टवरुन 20 पेक्षा जास्त फ्लाइट्स डायव्हर्ट करण्यात आल्या असून  एअरपोर्टदेखील बंद ठेवण्यात आलं.

वेगासमधल्या मेट्रोपॉलिटन पोलीस डिपार्टमेंटमधील अधिकारी शेरिफ जोसेफ लोम्बार्डो यांनी फायरिंग करणारा इसम ६४ वर्षांचा हा हल्लेखोर स्थानिक नागरिक असून त्याला ठार करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

 

दरम्यान या हल्लेखोराचा कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध नसल्याची माहिती प्राथमिक चौकशीत पुढे आली आहे.                   

loading...

Top 10 News

राशी भविष्य