Tuesday, 13 November 2018

कर्जबुडव्या विजय मल्ल्याच्या मुसक्या आवळल्या

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, लंडन

 

देशातल्या बँकांचं हजारो कोटींचं कर्ज बुडवून लंडनमध्ये पळालेल्या विजय मल्ल्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी लंडनमध्ये विजय मल्ल्याला बेड्या ठोकल्या. मल्ल्याला आता वेस्टमिन्स्टर कोर्टात हजर केलं जाणार आहे. 

 

विजय मल्ल्याला भारताच्या सुचनेवरुनच बेड्या ठोकल्याचं म्हटलं जातं. त्याबरोबरच त्याला आता भारतात परत पाठवण्याचीही शक्यता आहे.. सीबीआयची टीम लंडनमध्ये जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. कर्जबुडव्या विजय मल्ल्यानं देशातल्या विविध बँकांची तब्बल 9 हजार कोटींची कर्ज बुडवली आहेत. 

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य