Sunday, 18 November 2018

67 व्या वाढदिवसादिनी पंतप्रधान मोदींच्या हस्ते सरदार सरोवर धरणाचे उद्घाटन

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, गुजरात

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी आपल्या 67 व्या वाढदिवसादिनी गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यामध्ये सरदार सरोवर धरणाचे उद्घाटन केले. सरदार सरोवर धरणाच्या लोकार्पणदिनानिमित्त त्यांनी गुजरातच्या दाबोईमध्ये भाषण केले. सरदार सरोवर प्रकल्प नागरिकांसाठी हितकारक असल्याचे त्याच्या भाषणातून त्यांनी सांगितले. भाषणात त्यांनी शुभेच्छुकांचे आभार देखील मानले आहेत. 

56 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सरदार सरोवराचे लोकार्पण झाले आहे. 56 वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. सरदार सरोवर हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा प्रकल्प आहे.

उद्घाटन समारंभामध्ये गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्याचप्रमाणे राज्यातले धार्मिक व अध्यातिमक प्रमुख उपस्थित होते. 

 

सरदार सरोवर प्रकल्पाचं वैशिष्ट्य आणि पार्श्वभूमी 

 

अमेरिकेच्या ग्रँड काऊली धरणानंतर जगातलं दुसरं सर्वात मोठं धरण

सरदार सरोवर धरणाची उंची 138 मीटर, देशातलं सर्वात उंच धरण

धरणाला 30 दरवाजे, प्रत्येक दरवाजा 450 टन वजनाचा

दरवाजा बंद करण्यासाठी लागतो एक तास

धरणाची पुर्वीची उंची 121.92 मीटर, दरवाजे बंद केल्यानंतर उंची 138 मीटर

धरणाची जलसाठा क्षमता - 4.3 दशलक्ष क्युबिक मीटर

18 लाख हेक्टर्स जमिन ओलिताखाली येणार

नर्मदा नदीचं पाणी कालव्यांतून 9 हजार गावांत खेळवणार

धरणाच्या पाण्याचा वापर वीजनिर्मिती, सिंचनासाठी

57 टक्के वीज महाराष्ट्र, 27 टक्के मध्यप्रदेश तर 6 टक्के वीज गुजरात वापरणार

1961 मध्ये तत्कालीन पं. जवाहरलाल नेहरु यांनी केला शिलान्यास

नर्मदा धरणाच्या कामाला 1985 साली जबरदस्त विरोध

मेधा पाटकरांचा नर्मदा बचाव आंदोलनामुळे 1996 मध्ये काम थांबलं

सर्वोच्च न्यायालयाकडून 2000 साली काम पुन्हा सुरु करण्याचे आदेश

loading...

Top 10 News

राशी भविष्य