Tuesday, 20 November 2018

फेसबुक पोस्टवरून पत्रकार विद्यार्थ्याची निर्घृण हत्या

User Rating: 4 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, पाकिस्तान

 

फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याने पाकिस्तानमध्ये पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आली. मशाल खान असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव असून, तो पाकिस्तानच्या खैबर पख्तुनवा प्रांतातील अब्दुकल वाली खान विद्यापीठात पत्रकारितेचे शिक्षण घेत होता. 

 

मशाल खानने काही दिवसांपूर्वी लोकांच्या भावना दुखावणारा आक्षेपार्ह आणि अहमदी विचारसरणीचा पुरस्कार करणारा ऑनलाईन मजकूर प्रसिद्ध केला होता. याच रागातून विद्यापीठातील काही स्वयंघोषित रक्षकांनी मशालला बेदम चोप दिला आणि त्याला गोळी घातली. या घटनेच अब्दुल्ला नावाचा आणखी एक तरूणही जखमी झाला आहे. 

 

सूत्रांच्या माहितीनुसार, मशाल आणि अब्दुल्ला हे दोघे फेसबुकवरून अहमदी विचारांचा प्रसार करत होते. हा प्रकार घडला तेव्हा सुरूवातीला जमावाने अब्दुल्लाला घेरून त्याला कुराणातील पवित्र वचने म्हणायला सांगितली. त्याने आपण अहमदी विचारसरणीचे नसल्याचे वारंवार सांगितले. मात्र, विद्यार्थ्यांचा जमाव त्याला मारहाण करतच राहिला...त्याला हॉकी स्टीकने निर्घृणपणे मारहाण करण्यात आली. 

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य