Friday, 18 January 2019

I Instant recipes

ही चवीष्ट जोधपुरी भाजी बनवून पाहाच...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

आपल्या घरात दररोज वेगवेगळ्या भाज्या बनतात. प्रत्येकाची बनवण्याची पध्दत ही वेगळी असते. भाजी कशी रूचकर होईल यासाठी काही घटक त्यात मिक्स केले जातात. काहींना मिक्स भाजी खायला आवडते तर काहीजण फक्त बटाटा, फ्लाॅवर, फरसबी, गाजर, बीट, टॉमेटो अशा भाज्या खाण्यास जास्त पसंत करतात. ज्यांना मिक्स भाजी खायला आवडते. अशा लोकांना ही जोधपुरी भाजी नक्कीच आवडेल.एका वेगळ्या स्टाईलची मिस्क भाज्यांची जोधपुरी भाजी नक्की बनवून पाहा.       

    

साहित्य

पनीर- 1 कप

शिजवलेला मटार- 1 कप

उकडलेला बटाटा- 1 कप

शिजवलेला फ्लॉवर- 1 कप

टॉमेटो प्युरी- 1 कप

शिजवलेली फरसबी-½ कप

चिरलेलं गाजर- 1 कप

चिरलेला कांदा- 1 कप

आलं- लसूण पेस्ट- 1 टे. स्पून

लाल तिखट- 1 टे. स्पून

बडीशेप पुड-½ टे. स्पून

जीरे पूड-½ टे. स्पून

हळद-½ टी. स्पून

कसुरी मेथी-½ टी. स्पून

खडा मसाला- आवश्यकतेनुसार

मीठ- चवीनुसार

तूप- आवश्यकतेनुसार

कृती:- प्रथम एका पॅनमध्ये तूप गरम करून घेणे. त्यामध्ये तमालपत्र, वेलची, चक्रीफूल घालून ते चांगले परतून घ्या. त्यानंतर कांदा, आलं-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, बडीशेप पूड, जीरे पूड, टॉमेटो प्युरी घालून सर्व मिश्रण सगळं परतून घेणे. त्यामध्ये बटाटा, फ्लॉवर, फरसबी, मटार, गाजर, पनीर, कसुरी मेथी आणि मीठ घालून सर्व मिश्रण परतून घ्या. नंतर त्यात तळलेले ड्रायफ्रूट्स घालून सर्व्ह करा.

अशा प्रकारे घरच्याघरी जोधपुरी भाजी तयार.

 

गोड आणि हेल्दी 'पपर्इ जॅम'

 

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य