Sunday, 18 November 2018

I Instant recipes

केळ्याचा हलवा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, वेब टीम

फळांमध्ये पौष्टीक आणि सर्वांच्या खिशाला परवडणारे फळ म्हणजे केळे. केळ्याच्या सेवनाने शरीराला आवश्यक असलेले जीवनसत्व मिळतात.

केळ्याचे मिल्क शेक तर सगळ्यांच्या पसंतीचे आहे. पण, आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे केळ्याचा हलवा.

 

साहित्य

ओलं खोबरं     ½ वाटी

केळी             3

वेलची पूड       आवश्यकतेनुसार

दाण्याचं कूट     2 टे. स्पून

साखर             3 टे. स्पून

ड्रायफ्रूट पावडर   आवश्यकतेनुसार

 

कृती

प्रथम एका पॅनमध्ये तूप घालून त्यात ओलं खोबरं लालसर होईपर्यंत परतून घ्या. नंतर त्यात केळ्यांचे काप घालून पुन्हा परतून घ्या. परतलेल्या मिश्रणात वेलचीपूड, दाण्याचं कूट, साखर, ड्रायफ्रूट पावडर घालून मिश्रण एकजीव करून घ्या. अश्याप्रकारे केळ्याचा हलवा तयार

loading...

Top 10 News

राशी भविष्य