Thursday, 17 January 2019

I Instant recipes

उपवासाची शेवपुरी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, वेब टीम

 

नवरात्र आली की खवय्यांना नाद लागतात ते विविध खाद्यापदार्थांचे. अशा वेळी उपवास करणाऱ्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडते.  त्यांनी घबरुन जाऊ नये, आज आम्ही त्यांच्यासाठी घेऊन आलो आहोत उपवासाची शेवपुरी. 

 

साहित्य :

राजगिऱ्याचे मळलेले पीठ – 1 वाटी

हिरवी चटणी – 2 टेबल स्पून

डाळींबाचे दाणे – 1 वाटी

बटाट्याची शेव – 1 वाटी

चिंचगुळाची चटणी – 2 टेबल स्पून

उकडलेला बटाटा – 1 वाटी

कृती :

प्रथम राजगिऱ्याचं पीठ मळून घ्या.

त्याच्या पुऱ्या लाटुन त्याला टोचे मारुन पुऱ्या तळुन घ्या.

तयार केलेल्या पुऱ्यांवर उकडलेला बटाटा, हिरवी चटणी, अणि चिंचगुळाची चटणी घाला.

वरुन बटाट्याची शेव आणि डाळींबाचे दाणे घालुन सर्व्ह करा.

अशाप्रकारे उपवासाची शेवपूरी तयार.

loading...

Top 10 News

राशी भविष्य