Friday, 16 November 2018

I Instant recipes

उपवासाचा ढोकळा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, वेब टीम

 

ढोकळ्याचे विविध प्रकार आपण पाहिले असतील, पण उपवासाच्या ढोकळ्याची चव काही वेगळीच असते. म्हणूनच आज आपण पाहणार आहोत उपवासाचा ढोकळा.

 

साहित्य :

साबुदाण्याचे पीठ – 1 वाटी

वरीच्या तांदळाचे पीठ – 1 वाटी

दही – ½ वाटी

काळीमिरी पूड – 1 टी. स्पून

लालतिखट - 1 टी. स्पून

मिरचीचा ठेचा - 1 टी. स्पून

बेकींग सोडे - 1 टी. स्पून

मीठ – चवीनुसार

तेल – आवश्यकतेनुसार

कृती :

प्रथम एका बाऊलमध्ये दही फेटून घ्या.

नंतर त्यात पाणी, भगरीचं पीठ, साबुदाण्याचं पीठं, मीठ आणि मिरचीचा ठेचा घालुन मिश्रण एकजीव करुन घ्या.

नंतर या मिश्रणात बेकिंग पावडर घालुन त्यावर गरम तेल घाला आणि मिश्रण एकजीव करा.

तयार मिश्रण ट्रे मध्ये घालुन स्टिमरमध्ये ठेवा.

त्यावर लालतिखट आणि काळीमिरी पूड घालून 10 मिनिटे वाफवून घ्या.

अश्याप्रकारे उपवासाचा ढोकळा तयार.

loading...

Top 10 News

राशी भविष्य