Friday, 18 January 2019

I Instant recipes

रताळ्याचा शिरा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

नवरात्रीचे नऊ दिवस देवीच्या भक्तांसाठी खूप महत्वाचे असतात. या नवरात्रीत बहुतेकांचे उपवासही असतात. या उपवासात खव्व्यांना विविध पदार्थांचे आस्वाद घेता यावे, यासाठी आम्ही घेऊन आलो आहे खमंग रताळ्याचा शिरा. चला तर जाणून घेऊ या. 

 

साहीत्य :

 

1 वाटी उकडून किसलेले रताळे

 ½ वाटी साखर

 ½ वाटी दूध

 ½ वाटी ड्रायफ्रुट

 ¼ वाटी मिल्क पावडर

 ½ वाटी वेलची जायफळ

 ½ वाटी साजूक तुप

 

 

कृती:

 

प्रथम पॅनमध्ये साजूक तुप घालुन त्यात रताळ्याचा किस घालुन परतवुन घ्या. नंतर त्यात मिल्क पावडर, दूध, साखर आणि वेलची पुड घालुन मिश्रण चांगले शिजवुन घ्या. अशाप्रकारे तयार रताळ्याचा शिरा ड्रायफ्रुट्स घालुन गार्निश करा.

loading...

Top 10 News

राशी भविष्य