Wednesday, 23 January 2019

…आणि सिनेमासाठी 'त्याने' वडिलांना पेटवलं!

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

दक्षिणेत सिनेमाचं प्रचंड वेड असून आपल्या आवडत्या अभिनेत्यासाठी चाहते काहीही करण्यास तयार असतात. दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत, कमल हासन, अजित आणि विजय यांचा एक मोठा चाहतावर्ग आहे. आपल्या लाडक्या अभिनेत्याची पूजा करण्यापासून ते त्याच्यासाठी जीव देण्यापर्यंत चाहत्यांची तयारी असते. नुकताच अशीच एक घटना समोर आली आहे जिथे अभिनेता अजितच्या चाहत्याने सिनेमा बघायला पैसे दिले नाही म्हणून वडिलांनाच पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाचे नावदेखील अजित आहे. 20 वर्षीय अजितने वडिलांकडे ‘विश्वासम’ हा सिनेमा पाहण्यासाठी पैसे मागितले होते. पण वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला. यामुळे अजितला राग आला आणि त्याने 45 वर्षीय वडिलांना पेटवून दिले.

वडिल गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर त्यांना वाचवण्याचा पुरेपर प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी अजितला अटक केली आहे. अभिनेता अजितने मात्र अद्याप या घटनेवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून अजित प्रसारमाध्यमांपासून दूर आहे. तसेच कोणत्याही प्रमोशनल कार्यक्रमातही तो सहभागी होत नाही.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य