Wednesday, 23 January 2019

संचालक पदावरुन हटवल्यानंतर आलोक वर्मांचा राजीनामा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

विशेष संसदीय समितीने आलोक वर्मांची सीबीआय संचालक पदावरून उचलबांगडी केल्यानंतर एकाच दिवसात आलोक वर्मा यांनी राजीनामा दिला आहे. मला अंतर्मुख होण्याची वेळ आली आहे असे वर्मा यांनी आपल्या राजीनाम्याच्या अर्जात म्हटले आहे.

आलोक वर्मांवर सप्टेंबर 2018 मध्ये सीबीआय विशेष संचालक राकेश अस्थांनानी मोइन कुरेशी प्रकरणी 2 कोटींची लाच घेतल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवून एम. नागेश्वर राव यांची त्यांच्याजागी तात्काळ नियुक्ती करण्यात आली होती. ही रजा बेकायदेशीर ठरवत सर्वोच्च न्यायालयाने वर्मा यांना पुन्हा कामावर येण्याचे आदेश दिले होते. तसेच मोइन कुरेशी व इतर भ्रष्टाचारांच्या आरोपांचा निर्णय विशेष संसदीय समितीवर सोपवला होता. 

दरम्यान पुन्हा पदाची सूत्र सांभाळल्यावर वर्मा यांनी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली विशेष संसदीय समितीने वर्मांची वर्तणूक संशयास्पद असल्याचा निर्वाळा देत त्यांची सीबीआयमधून गुरुवारी उचलबांगडी केली. अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण दल आणि गृहरक्षक दलाच्या महासंचालकपदावर त्यांना पाठवण्यात आले होते. आपल्यावरचे सगळे आरोप खोटे असल्याचे स्पष्टीकरण गुरुवारी रात्री आलोक वर्मांनी दिले होते. पण चार-पाच महिन्याच्या राजकीय नाट्यानंतर अखेर आलोक वर्मांनी राजीनामा देणेच पसंत केले.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य