Wednesday, 23 January 2019

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या वने डे सामन्यात राहुल- हार्दिक यांना वगळण्यात आलं

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

कॉफी विथ करण या कार्यक्रमात केलेली आक्षेपार्ह विधानं क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुलला महागात पडण्याची शक्यता वाढली आहे. हार्दिक आणि राहुलने या कार्यक्रमात महिलांबद्दल केलेली विधानं वक्तव्य वादग्रस्त ठरली. या प्रकरणी बीसीसीआयचे प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी दोन्ही खेळाडूंवर 2 सामन्यांची बंदी घालण्याची शिफारस केली होती. त्यामुळे या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे.

कॉफी विथ करण या कार्यक्रमातील हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुलच्या विधानांची बीसीसीआयकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. कर्णधार विराट कोहलीने या संपूर्ण प्रकारापासून संघाला वेगळे ठेवले आहे. पांड्या आणि राहुलची विधानं ही त्यांची मतं आहेत. संघाचा त्यांच्या विधानांशी कोणताही संबंध नाही, असे विराटने स्पष्टपणे माध्यमांना सांगितले आहे. दुसरीकडे बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरींनीही या विधानांवर आक्षेप घेतला. दोन्ही क्रिकेटपटूंनी कार्यक्रमाला जाण्यासाठी परवानगी घेतली होती का, अशी विचारणा चौधरींनी प्रशासकीय समितीकडे केली होती.

या संपूर्ण प्रकरणाबद्दल बीसीसीआयच्या कोषाध्यक्षांनी प्रशासकीय समितीच्या सदस्या डायना इडुल्जींना पत्र लिहिले आहे. 'कॉफी विथ करण कार्यक्रमात क्रिकेटपटूंनी केलेल्या विधानांमुळे भारतीय क्रिकेट आणि क्रिकेटपटूंच्या प्रतिष्ठेला धक्का लागला आहे. त्यांचे वर्तन चुकीचे होते,' असे चौधरींनी पत्रात नमूद केले आहे. 'बीसीसीआयच्या नियमांनुसार क्रिकेटपटूंना कार्यक्रमात जाताना परवानगी घ्यावी लागते. तशी परवानगी या क्रिकेटपटूंनी घेतली होती का?', अशी विचारणादेखील चौधरींनी केली होती. अखेर बीसीसीआयचे मुख्य प्रशासक विनोद राय यांनी या प्रकरणाबाबत हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुल या दोघांवर कारवाई केली असून या दोघांंनाही ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या वने डे सामन्यात वगळले आहे.

  

 

 

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य