Saturday, 15 December 2018

"मुस्लिम विभागांत जा आणि..." कमलनाथ यांचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल!

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

काँग्रेस पक्षाचे मध्य प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये मुस्लिम मतदारांबद्दल वक्तव्य करताना दिसत आहेत.

या व्हायरल व्हिडिओमध्ये कमलनाथ मुस्लिम समुदायाच्या लोकांशी बोलताना दिसत आहेत. यावेळी ते सांगत आहेत, की “मुस्लिम बुथवर 90% पर्यंत मतदान न झाल्यास आमचं खूप नुकसान होऊ शकतं.” या व्हिडिओमध्ये पुढे ते असंही म्हणताना दिसत आहेत, की ‘गेल्या निवडणुकीत मुस्लिम बूथवर 50-60% मतदान झालं. 90% मतदान का झालं नाही, याचं आपल्याला आता पोस्ट मॉर्टम करण्याची गरज आहे. तुम्हाला माहीत आहेत की कोणत्या भागात किती मुसलमान आहेत. तिकडे जाऊन त्या मुस्लिमांकडून आणखी मतदान करवून घ्या.’

हिंदूंची भीती घालून मुस्लिमांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न कमलनाथ करत आहेत. हिंदू मोदींना मत देणार. त्यामुळे मुस्लिमांनी काँग्रेसलाच मत द्यावं. आपण हिंदूंना नंतर पाहून घेऊ... अशी रणनीती कमलनाथ थेटपणे जाहीर करताना दिसत आहेत.

 

 

कमलनाथ यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. थेटपणे धार्मिक गोष्टींच्या आधारावर मतदानाची स्ट्रॅटेजी बनवताना ते दिसत आहेत. यापूर्वीही अधिकाऱ्यांना धमकी देतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तसंच महिलांना निवडणुकीचं तिकीट देण्याबद्दलही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दलही त्यांनी याआधी अनेकदा वादग्रस्त विधानं केली होती. मात्र यावेळी त्यांनी केलेलं विधान पुन्हा एकदा व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. ट्वीटरवर #ArrestKamalnath हा हॅशटॅगही व्हायरल झालाय. कमलनाथ यांच्या नव्या व्हायरल व्हिडिओमुळे केवळ कमलनाथच नव्हे, तर काँग्रेसपुढेही अडचण निर्माण झाली आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य